'महाकाव्य शिवप्रताप' हा ६५० पृष्ठांचा काव्यमय ग्रंथ आता सर्वत्र उपलब्ध आहे. महाकाव्य शिवप्रतापची काही ठळक वैशिष्ट्ये :-
१. मराठी भाषेतील १९ वृत्तांतले पहिले वृत्तबद्ध महाकाव्य. अगदी सोप्या मराठी भाषेत ३००० श्लोक. वृत्तबद्ध असल्याने गेय, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध काव्य. छत्रपति श्री शिवाजी महाराजांचे काव्यमय चरित्र.
२. पद्मविभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना. तसेच कै. दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा ग्रंथात समावेश.
३. हे काव्य 'कवी समर' हे नाव घेऊन वयाच्या १६व्या वर्षी लिहिले. संपूर्ण महाकाव्य ५० दिवसांत लिहून पूर्ण केले.
1. ‘महाकाव्य शिवप्रताप’ : वयाच्या सोळाव्या वर्षी मराठी भाषेतील पहिल्या महाकाव्याचे लेखन. या महाकाव्यात तब्बल 3,500 श्लोक आहेत. त्याशिवाय हे सर्व भाषांमधील संपूर्णत: 19 वृत्तांमध्ये बांधलेले पहिले महाकाव्य आहे. या महाकाव्यात 10 खंड व 119 सर्ग समाविष्ट आहेत. या महाकाव्याचे लेखन केवळ 50 दिवसांत झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर हे महाकाव्य आधारित आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी या महाकाव्याला प्रस्तावना दिली असून ‘पुरंदरे प्रकाशनाने’ हे महाकाव्य प्रकाशित केले आहे. 2. ‘संगीत चंद्रप्रिया’ : वयाच्या 17व्या वर्षी ‘संगीत चंद्रप्रिया’ या संगीत नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली. हे नाटक गुप्त साम्राज्याचे सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या जीवनावर आधारित आहे. या नाटकाचे प्रयोग पुणे, रत्नागिरी, मुंबई, नाशिक झाले. रंगभूमीवर 25 वर्षे कार्यरत असलेल्या सौ.अस्मिताताई चिंचाळकर या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. ‘संगीत चंद्रप्रिया’ची दखल तब्बल पंचवीस वृत्तपत्रांनी व माध्यमांनी घेतली. 3. अप्रकाशित कादंबरी लेखन : लक्ष्मणाच्या पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित ‘उर्मिला’ या 300 पानी कादंबरीचे वयाच्या 19व्या वर्षी लेखन. महात्मा गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित ‘तथागत’ या 500 पानी कादंबरीचे वयाच्या 20व्या वर्षी लेखन. तसेच काल्पनिक युद्धकथेचा आधार घेऊन लिहिलेली ‘युवराज प्रमोदन – भाग 1’ ही 16 व्या वर्षी लिहिलेली 300 पानी कादंबरी. 4. ‘चंद्रवेल’: मराठी भाषेतील पहिले दूतकाव्य. दोन खंड व 80 दीर्घश्लोक यांमध्ये हे दूतकाव्य बांधले आहे. आजवर केवळ कालिदासाने लिहिलेल्या दूतकाव्याची भाषांतरे मराठी भाषेत झाली. मराठी भाषेत लिहिलेले हे पहिले कल्पनाविलासी दूतकाव्य आहे. 5. काव्यलेखन : छंदबद्ध, वृत्तबद्ध आणि मुक्तछंदातील जवळपास 100 कवितांचे लेखन. तसेच मराठी भाषेत 100हून अधिक गजलांचे लेखन संपन्न. 6. ललितलेखन : ‘दै.महाराष्ट्र टाईम्स’ वृत्तपत्रात कातरवेळ या सदरात 14 ललितलेख प्रकाशित झाले आहेत. 7. नाट्यलेखन : शेक्सपिअरच्या ‘रोमिओ आणि ज्युलिएट’ या नाटकाचा भावानुवाद केला आहे. तसेच ‘संगीत कालिदासवियोग’ हे नवीन संगीत नाटकही लिहिले आहे.
पुरस्कार : 1. 2019 वर्षाचा बालगंधर्व संगीत मंडळाचा ‘अण्णासाहेब किर्लोस्कर संगीतनाट्य पुरस्कार’ प्रदान. 2. संगीत क्षेत्रातील योगदानाकरता पं.शंकरराव वैरागकर प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कार. 3. नाशिक येथील चैत्र उद्योग समूहाचा 2019चा ‘चैत्रगौरव पुरस्कार’ प्रदान. 4. साहित्यातील योगदानाकरता ‘दै.महाराष्ट्र टाईम्स’ वृत्तपत्राच्या साहित्य संमेलनात विशेष पुरस्काराने गौरव. 5. शिवाय विविध वृत्तपत्रांतील 50 हून अधिक जास्त बातम्या कार्याबाबत प्रकाशित व 40हून जास्त मुलाखती संपन्न.