Anil Awachat's Blog
January 30, 2022
अनिल अवचट, काही आठवणी…
अनिल अवचटांना प्रत्यक्ष भेटलो ते साधारण २००७ च्या सुरुवातीस. त्यांचे लिखाण (माणसं, स्वतःविषयी, कार्यरत, वेध…) आधीपासुनच आवडायचे. त्यांच्यामुळेच अभय बंग, बाविस्कर यांच्या कामांची ओळख झाली, मध्यमवर्गीय परिघाबाहेरच्या कित्येक प्रश्नांची माहिती झाली. त्या पहिल्या भेटीतच त्याचा मला “ए बाबा” म्हण असा आग्रहवजा आदेश आम्हाला कायमचेच आपले करून गेला. Orkut च्या दिवसात आम्ही काही मित्र अनिल अवचट […]
Published on January 30, 2022 07:27
April 10, 2020
Announcement: New administrator
10th April 2020 आज, दिनांक १० एप्रिल २०२० पासून सौ. यशोदा वाकणकर (डॉ. अनिल अवचट यांच्या कन्या) ह्या प्रामुख्याने ‘अनिल अवचट’ ब्लॉगचे प्रशासन (administration) आणि देखभाल (maintenance) सांभाळतील. Starting today (10th April 2020), this blog will be primarily administered and maintained by Mrs. Yashoda Wakankar (Dr. Anil Awachat’s younger daughter). I am hoping that she […]
Published on April 10, 2020 06:34
November 18, 2018
अनिल अवचट ह्यांच्या अनुभव २०१८ दिवाळी अंकातील ‘गुणगुणसेन’ या लेखातून
उस्ताद अमीर ख़ाँ असेच संगीत हाच प्राण असलेले आणि त्यातच देहभान हरपून गेलेले कलावंत. ‘गुणगुणसेन’ ह्या लेखात अनिल अवचटांनी त्यांच्या अशाच काही आठवणी सांगितल्या आहेत – एकदा सरोदवादक अमजद अलींबरोबर प्रेक्षागृहात मध्यरात्र होईपर्यंत दंग होऊन एकटेच गात होते, कोणीही प्रेक्षक नसल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही. हे ते दोन किस्से – शेवटी उस्ताद अमीर ख़ाँच्या गाण्याविषयी, […]
Published on November 18, 2018 00:31
March 23, 2017
पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना 15 Jan 2017
१५ जानेवारीला पुण्यात, बालगंधर्वला डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अभय बंग या तिघांची एकत्र मुलाखत विवेक सावंत ह्यांनी घेतली. त्या तिघांशीही मो़कळ्या गप्पा झाल्या आणि त्याच्या कामांमागील प्रेरणांची उलगडा झाला. आनंद नाडकर्णी यांनी अवचटांची कामाची introvert पद्धत आणि अभय बंगांची कामाची extrovert पद्धत फार छान उलगडून सांगितली. अभय बंगांचे हे विचार फार महत्वाचे, दिशादर्शक वाटतात – आपल्या गरजा कमी ठेवल्या की आपल्याला मनासारखे काम करायचे स्वातंत्र्य मिळते. पैशासाठी ऊर फुटेस्तोवर काम […]

Published on March 23, 2017 23:03
July 8, 2016
संभ्रम आणि धार्मिक या त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलताना अनिल अवचट
स्वतः अनिल अवचट त्यांच्या “संभ्रम” आणि “धार्मिक” या पुस्तकांबद्दल बोलतात आहे, जरूर बघा –

Published on July 08, 2016 00:54
October 29, 2014
पुस्तक रसग्रहण : माझी चित्तरकथा (ऋजुता घाटे)
वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणारी, विचार करायला लावणारी, अस्वस्थ व्हायला लावणारी; सामाजिक प्रश्नांवरील अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकं अनिल अवचट यांनी लिहिलेली आहेत. एक संवेदनशील मन असलेला माणूस हे सर्व लोकांपुढे यावं, त्यांनाही तळागाळातील माणसांचं जगणं कळावं यासाठी हे लेखन करतो आणि पुस्तकांच्या रुपात ते वाचकांसमोर ठेवतो; हे प्रश्न जाणून घेणारा त्याबद्दल लिहिणारा हा लेखक मन […]

Published on October 29, 2014 22:42
October 16, 2014
२०१४ दिवाळी अंकातील अनिल अवचट ह्यांचे लेख
या वर्षीच्या (२०१४) दिवाळी अंकातील अनिल अवचट ह्यांचे लेख - साप्ताहिक सकाळ - तुकोबा दीपावली - आजीपर्व अनुभव - कॅन्सर मौज - रक्ताची गोष्ट मुक्त शब्द - गावे, मनात वसलेली प्रपंच - माझे खडी बोलीतील दोहे पासवर्ड - कुत्र्याची चित्रे बाल साधना - गोष्ट

Published on October 16, 2014 02:47
July 2, 2014
अनुभव मधील लेख –
बाबाचा अनुभव मधील एक अतिशय सुंदर लेख – तरीही एक प्रश्न आहेच. खरोखर लेखनाचा समाजजीवनावर परिणाम होतो का? ‘माणसं’मधल्या लेखांपैकी हमाल, तंबाखू कामगार यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. पण तो नुसत्या लेखाचा झाला असता का? पुण्यात बाबा आढावांची, निपाणीत सुभाष जोशींची संघटना होती, चळवळ होती म्हणून त्यांनी लेखांचा उपयोग करून चळवळ पुढे नेली. पण ही चळवळ […]

Published on July 02, 2014 11:38
June 29, 2013
अनिल अवचट यांना राष्ट्रीय पुरस्कार
व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. अनिल अवचट यांना २६ जून २०१३ रोजी राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात आला. व्यक्तिगत कार्याबद्दल हा पुरस्कार केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयातर्फे दिला जातो. ‘गर्द’ या पुस्तकातून अनिल अवचट यांनी ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या व्यथा जगासमोर आणल्या. हे पुस्तक लिहितांना आलेले अनुभव आणि त्यानंतर […]

Published on June 29, 2013 10:04
August 22, 2010
अनिल अवचट यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार
अनिल अवचट ह्यांच्या “सृष्टीत ..गोष्टीत” ह्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पहिला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे!! पुरस्कार वितरण समारंभ नोव्हेंबर मध्ये दिल्लीला होईल. आमच्या लाडक्या बाबाचे हार्दीक अभिनंदन! दैनिक सकाळमधे प्रसिध्द झालेले हे अनिल अवचट ह्याचे मनोगत – “बालसाहित्याच्या प्रांतामध्ये साने गुरुजींच्या कामाची दोरी घेऊन मी पुढे चाललो आहे. मी मोठा आहे की छोटा हे मला […]

Published on August 22, 2010 10:32
Anil Awachat's Blog
- Anil Awachat's profile
- 48 followers
Anil Awachat isn't a Goodreads Author
(yet),
but they
do have a blog,
so here are some recent posts imported from
their feed.
