Narendra Dabholkar's Blog
March 21, 2009
अंधश्रद्धा निर्मूलन समितिसाठी गोडबाबा हे प्रकरण १२ वर्षाप...
अंधश्रद्धा निर्मूलन समितिसाठी गोडबाबा हे प्रकरण १२ वर्षापूर्वीच संपलेल आहे , आजपर्यंत वारंवार मागणी करूनही गोडबाबा ने कोणत्याही प्रकारची अधिकृत वैज्ञानिक चाचणी सिद्ध केलेली नाही, तसेच त्याने गोड केलेल्या पाण्यात प्रचंड प्रमाणात सॅकरिन आढळून आले॰ या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गोडबाबाचा हा तथाकथित चमत्कार दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी सादर करतात, यामुळेच गेल्या बारा वर्षात गोडबाबाची बुवाबाजी संपल्यातच जमा आहे॰ अशा बाबी social networking site वर पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न केविलवाण्या व पराभूत मनोवृत्तिचे लक्षण आहे॰
नरेन्द्र दाभोलकर
नरेन्द्र दाभोलकर
Published on March 21, 2009 12:22
March 10, 2009
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य भारतातील या स्वरू...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य भारतातील या स्वरूपाचे आणि एवढे व्यापक बहुदा एकमेव आहे॰ या कार्याची पंचसूत्री अशी
१ शोषण करण्यासाठी कारणीभूत अंधश्रद्धांना विरोध करणे,
२ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार अणि अंगीकार करणे,
३ धर्माची विधायक कृतीशील चिकित्सा करणे
४ दैववादाला नकार देणे,
५ व्यापक परिवर्तनाशी विचाराने आणि कृतीने स्वतःला जोडून घेणे॰
हे कार्य पूर्ण अर्थाने शैक्षणिक आहे अणि भारतीय संविधानातील नागरिकांच्या कर्तव्याशी धरून आहे॰ भारताचे शैक्षणिक धोरण शिक्षणाचे काही महत्वाचे गाभा घटक सांगते॰ त्यातील एक घटक आहे वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती॰ त्याबरोबरच संविधानात सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे॰
हा विचार आणि ही जाणीव कृतीशील करण्याचा मार्ग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनेतून जातो॰ संघटनेत सहभागी झालेल्यांना एक नवा समर्थ दृष्टिकोन मिळतो, जो त्यांना जीवनात अधिक चांगला व यशस्वी माणूस बनवू शकतो॰काम करणे शक्यच नसेल तर विचार समजून घेणे आणि अंधश्रद्धा दूर होण्यासाठी विचार पसरवत रहाने हे देखील महत्वाचे आहेच, यासाठीच आपल्याशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याद्यक्ष नरेन्द्र दाभोलकर मनःपूर्वक संवाद साधू इच्छितात॰ (कृपया आपली प्रतिक्रिया व प्रश्न कळवा) (अधिक माहितीसाठी मेल करा kolhapuranis@gmail.com वर)(प्रश्न नोंदवण्यासाठी व डॉ दाभोलकर यांच्या उत्तरासाठी "comments" येथे click करा)

Published on March 10, 2009 10:37
Narendra Dabholkar's Blog
- Narendra Dabholkar's profile
- 37 followers
Narendra Dabholkar isn't a Goodreads Author
(yet),
but they
do have a blog,
so here are some recent posts imported from
their feed.